संजय आणि मलती परत आल्या नंतर त्यांच्या बर जरा अंकुश पडले. सुलभा मात्र संजय ला न जुमानता अशोक शी स्बंध ठेवतच होती. संजय षंड होता तेव्हा या बाबत तो काहीच करु शकत नव्हता त्या मुळे सुलभाने त्याला ही आपल्या कुटील डावात सामील करून घेतले. मालती ने विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अशोकने मालती चा विरोध धुडकावून लावला. त्याने स्पष्ट शब्दात मालतीला सांगितले की जे सुख ती देऊ शकत नाही ते सुख त्याला सुलभा कडुन मिळत आहे त्या मुळे तो हे संबंध ठेवणारच.
मालती ने शेवटी हार पत्कारली आणि सुलभाचा पहीला विजय झाला. पण येवढ्यावर थांबेल ती सुलभा कसली. दाणापुरचा अलीकडच्या काळात झालेला विस्तार आणि नागरीकांची मागणी मान्य करत शासनाने दाणापुर ला नगरपंचायत चा दर्जा दिला. निवडणुक परत लागली आणि अपेक्षेप्रमाणे सुलभा आणि मालती परत निवडुन आल्या. महिला आरक्षण असल्या ने पहिल्या नगराध्यक्षा कोण असणार या विषयी सगळ्यांना उत्सुकता होती.
दाणापुर च्या पहिल्या नगराध्यक्षा होप्प्याचा मान मिळला तो सौ. सुलभा संजय झाटेना. त्यांना मोलाची साथ आणि पाठींबाअ होता श्री. अशोकराव शेटे यांचा. त्या दिवशी सुलभाने मालती कडुन झालेल्या आपल्या मागच्या पराभावाची परतफेड व्याजा सहीत करत आपल्या राजकारणातील नव्या आयुष्याची दिमाखदार सुरुवात केली.
0 टिप्पण्या